Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

जावेद यांच्या कृतीवरुन आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे रफीक शेख यांनी नमूद केले.
washim , washim city police, gold
washim , washim city police, goldsaam tv

Washim News : कांदा लसूण विक्रेत्याने त्याला सापडलेले आठ लाखांचे दागिने पाेलिस ठाण्यात नेहून दिले. पाेलिसांनी ज्या शेतक-याचे हे दागिने हाेते त्याचा शाेध घेत त्याला परत केले. लाख माेलाचे दागिने परत मिळाल्याने शेतक-याच्या डाेळ्यातून आनंद अश्रु आले. कांदा लसूण विक्रेत्याच्या प्रामाणिकपणाचे (honesty) सर्वत्र काैतुक हाेत आहे.

washim , washim city police, gold
Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

वाशिम (washim) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील रमेश घुगे हे बँकेतून 77 ग्रॅम सोन्याचे (gold) दागिने आणि 35 हजार रोख रक्कम घरी घेऊन निघाले हाेते. वाटेत त्यांच्याकडून दागिने आणि पैसे गहाळ झाले. त्यामुळे त्यांना माेठा धक्का बसला.

दरम्यान वाशीम शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात कांदा, लसूणचा व्यवसाय करणारे शेख जावेद यांना दागिने आणि पैसे सापडले. त्यानंतर शेख यांनी तडक शहर पाेलिस ठाणे गाठले. तेथे घडलेला प्रकार सांगितला. पाेलिसांनी दागिने आणि पैसे सुरक्षित ठेवले.

washim , washim city police, gold
Good News : डॉक्टरांना सॅल्यूट! ६व्या महिन्यांत बाळंतपण, बाळाचं वजन अवघं ५०० ग्रॅम; डॉक्टरांमुळं बाळ अन् आई ठणठणीत

पाेलिसांनी रमेश घुगे यांचा शाेध घेतला. त्यांना सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपये परत दिले. त्यावेळी घुगे यांच्या डाेळ्यातून आनंद अश्रु आले. ते म्हणाले मुलाच्या लग्नासाठी दागिने आणि पैसे बँकेतून घेऊन निघालाे हाेताे. हा मुद्देमाल हरवला होता. त्यामुळं लग्न होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शेख यांना सापडलेले लाख माेलाचे दागिने परत करुन त्यांनी आमच्या कुटुंबाला सुखद धक्का दिला आहे. (Maharashtra News)

शेख जावेद म्हणाले मागील अनेक दिवसांपासून मी चाैकात कांदा, लसूण विक्री करीत आहे. मला सोन्याच्या दागिन्यासह राेख रक्कम मिळाली. ताे शहर पोलीस ठाण्यात जमा केला. आज हे सर्व साहित्य मूळ मालकाला परत मिळाल्याने मला समाधान वाटलं. दरम्यान पाेलिस निरीक्षक रफीक शेख यांच्यासह नागरिकांनी जावेद यांच्या कृतीचे काैतुक केले. जावेद यांच्या कृतीवरुन आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे रफीक शेख यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com