कसणी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

गावांना-वस्त्यांना जोडणारे लहान-मोठे पूल आता पाण्याखाली जाऊ लागले आहेत.
कसणी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
कसणी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्पओंकार कदम

ओंकार कदम

सातारा - जिल्ह्यात सध्या पावसाने Rain चांगलाच जोर धरला आहे शहरी भागात पावसाची संततधार सुरूअसून ग्रामीण आणि डोंगरी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.पाटण-कोयना भागात सुद्धा पावसाने चांगलाच जोर धरला असून गावांना-वस्त्यांना जोडणारे लहान-मोठे पूल Bridge आता पाण्याखाली जाऊ लागले आहेत.

हे देखील पहा -

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कसणी गावाजवळचा ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने कसणीसह अनेक दुर्गम गावांकडील वाहतूक ठप्प झाली होती. ये-जा करणारे पादचारी,वाहनचालक व प्रवासी तीन तास पुलाच्या दुतर्फा अडकून पडले होते.

कसणी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
मुख्याध्यापकांने पुस्तकं रेखाटली शाळेच्या भिंतीवर; शाळेला दिलं किल्ल्याचं रूप

पवारवाडी-कसणी-म्हाइंगडेवाडी हा रस्ता सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सुमारे पंचवीसवर दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांसाठी उपयुक्त आहे.मात्र कसणी येथील असणारा पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात सतत पाण्याखाली रहात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com