मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चार किलोमीटर पर्यंत रांगा
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चार किलोमीटर पर्यंत रांगाराजेश भोस्तेकर

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चार किलोमीटर पर्यंत रांगा

कोकणात येणारी वाहतूकही धीम्या गतिने सुरू

राजेश भोस्तेकर

रायगड -  मुंबई Mumbai गोवा Goa महामार्गावर बेशिस्त वाहन चालकामुळे महाड केबुर्ली गावाजवळ वाहतूक कोंडी Traffic jam झाली आहे. चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे कोकणातून Kokan परतीच्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. महामार्गावर तीन ते चार लाईनी वाहनाच्या लागल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस Police वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कोकणात येणारी वाहतूकही धीम्या गतिने सुरू आहे.

हे देखील पहा -

11 सप्टेंबर रोजी दीड गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी हे मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील केबुर्ली गावाजवळ वाहन चालकांनी पुढे जाण्याच्या नादात तीन ते चार लाईनी केल्या आहेत. त्यामुळे चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकाच्या बेशिस्त पानाचा फटका हा सर्वच परतीच्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com