आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास

ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वेस्थानकात थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे.
आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास
आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवासSaam Tv

नाशिक - नाशिकरोडहून Nashik आता रेल्वेने 2 तास 55 मिनिटांत मुंबईला Mumbai पोहोचणे शक्य होणार आहे. कारण या रेल्वे Railway मार्गावरील रेल्वेस्थानकांवर थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे. ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वेस्थानकात थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा सध्याचा वेग सरासरी ताशी 110 ते 120 किलोमीटरचा वेग वाढवून तो ताशी 140 ते 160 किलोमीटर करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. 

हे देखील पहा -

सद्यस्थितीत रेल्वेस्थानकात ट्रॅक बदलतांना गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे गाडीतील प्रवाशांनाही झटका बसतो. मात्र गाड्यांचा वेग वाढवल्यानंतर ट्रॅकवरील जॉईंट बदलतांना प्रवाशांना झटका बसू नये, यासाठी आता रेल्वेस्थानकात सामान्य स्विचऐवजी थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे.

आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास
सिंधुदुर्ग : शनिवारपर्यंत अतिवृष्टीचे संकेत; अशी घ्या काळजी

त्यामुळे गाड्यांचा वेग ताशी 140 ते 160 किलोमीटरपर्यंत वाढवल्यानंतरही ट्रॅक बदलताना गाड्यांचा वेग कमी करण्याची आवश्यकता भासणार नाही तसंच प्रवाशांनाही धक्का बसणार नाही, तर प्रवासाच्या वेळेतही तब्बल 25 टक्के बचत होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com