Goa : गाेव्याच्या दारुमुळं चढला पारा; काॅंग्रेस नेत्याच्या ट्विटवर शंभूराज देसाईंनी फटकारलं

देसाई यांच्या वक्तव्यानंतर काॅंग्रेसचे सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं हाेते.
Goa, Shambhuraj Desai , Maharashtra
Goa, Shambhuraj Desai , Maharashtrasaam tv

Satara : गोव्यातून (goa) दारू आणणाऱ्यांवर येथून पुढे मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी दिली. तीन वेळा अशा प्रकरणात दोषी आढळल्यास ही कारवाई केली जाईल असेही देसाईंनी स्पष्ट केले. गोव्यातून अवैधरित्या केल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. (Breaking Marathi News)

गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने महाराष्ट्र राज्यात दारू आणली जाते. त्यामुळे अशा प्रकारे रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Goa, Shambhuraj Desai , Maharashtra
Udayanraje News : उदयनराजेंचा पवार कुटुंबियावर गंभीर आराेप म्हणाले...,

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी शिंदे सरकारला माेक्का कायदा कळतो का असं ट्विट केले आहे. त्यावर मंत्री देसाई यांना छेडलं असता ते म्हणाले मी त्याबाबत सांगितलेली माहिती सचिन सावंत यांनी नीट ऐकावी असं फटकारलं आहे.

Goa, Shambhuraj Desai , Maharashtra
Satara News : गर्दीत आपलीच लोक टाळ्या वाजवायला बसवली असतात; उदयनराजेंचा अजित पवारांना खाेचक टाेला

मंत्री देसाई म्हणाले दारुची करणं तस्करी हे गैरकृत्य आहे. गोव्यातून आणलेली दारू राज्यात आणून विकली जाते. त्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या दारू विक्रीवर होताे. उत्पादन घटते. राज्याची आर्थिक हानी होते. आपल्या राज्यातील तिजोरीतला पैसा दुसऱ्या राज्यात जात असेल तर त्याला सचिन सावंत यांचे समर्थन आहे का असा सवालही शंभूराज देसाई यांनी सावंत यांना केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Goa, Shambhuraj Desai , Maharashtra
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com