रुग्णालय सील असतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच

आज खामगाव जवळील किसन नगर मधील रुग्ण लक्ष्मण काटे वय ५० यांना साधारण खोकल्या साठी डॉ.आशिष अग्रवाल याने शेजारील इंगळे हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते.
रुग्णालय सील असतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच
रुग्णालय सील असतानाही रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरूचसंजय जाधव

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव (Buldhana Khamgoan) येथील डॉ.आशिष अग्रवाल यांच्यावर अवैध कोविड सेन्टर चालविणे, कोविड रुग्णावर परवानगीशिवाय उपचार करणे, रुग्णाला 14 रेमिडिसिविर इंजेक्शन्स देणे अशा गंभीर आरोपाखाली दोन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी यांच्या आदेशाने लाईफलाईन हॉस्पिटल सील करण्यात आले होते. असं असतानाही डॉ.आशिष अग्रवाल यांनी आपल्या रुग्णालया शेजारील रूग्णालयात रुग्ण भरती करून रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरूच होता.

आज खामगाव जवळील किसन नगर मधील रुग्ण लक्ष्मण काटे वय ५० यांना साधारण खोकल्या साठी डॉ.आशिष अग्रवाल याने शेजारील इंगळे हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. अचानक चार वाजे दरम्यान लक्ष्मण यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या मृत्यू झाला, डॉक्टरांनी नातेवाईकांना एक तास मृत्यू बद्दल माहिती दिली नाही व नंतर नातेवाईकांना बोलावून तुमच्या रुग्णाची परिस्थिती गंभीर असून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तुमचा रुग्ण मृत्यू होऊन जवळपास एक तास झाला असल्याचे सांगितले.

नातेवाईकांनी पुन्हा डॉ.आशिष अग्रवाल यांच्या रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवुन पोलीसात धाव घेतली. दरम्यान रुग्णालय सील असूनही डॉ. आशिष अग्रवाल याने आमच्या रुग्णावर उपचार करून जीवे मारले असा आरोप करत नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलं आहे. जो पर्यंत डॉ. आशिष अग्रवाल वर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही मृतदेह येथून हलविणार नसल्याची नातेवाईकांनी म्हटलं आहे. सध्या रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत मृतदेह असून परिसरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com