५० एकर जंगल भुईसपाट, झेडपीतील महिला कर्मचाऱ्याचे धाडस

५० एकर जंगल भुईसपाट, झेडपीतील महिला कर्मचाऱ्याचे धाडस
फाईल फोटो

गडचिरोली : सरकार आणि पर्यावरण प्रेमी जंगल राखण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दुसरीकडे गडचिरोलीत वनसंपदेची बेसुमार कत्तल सुरू आहे. तस्करांसह काही शेतकरीही यात हात मारून घेत आहेत. गडचिरोली तालु्क्यातील चुरचुरा गावात घडलेला प्रकार भयंकर आहे.

एका महिला शेतकऱ्याने चक्क सरकारचा म्हणजे वन विभागाचा बांध कोरला आहे. थोडाथिडका नव्हे तर तब्बल पन्नास एकरातील जंगलच त्याने भुईसपाट केलंय. या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड गावकऱ्यांनीच केलाय.Trees were cut down in 50 acres of forest in Gadchiroli

फाईल फोटो
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळले

विशेष म्हणजे संबंधित शेतकरी महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. गायत्री फुलझेले असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांनी सात एकर अतिक्रमण केलेली शेती विकत घेतली होती. त्या सात एकर शेतीत बारीक झुडपे असल्याने तोडण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घेतली. मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतर स्वतःचे जागेऐवजी वनविभाग आणि महसूल विभागाच्या जमिनीवर असलेले अंदाजे पन्नास एकर जंगल जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून पूर्ण भुईसपाट केले.

कत्तल केलेल्या पाचशेपेक्षा अधिक झाडांची लाकडे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच ठिकाणी जमिनीत पुरण्यात आली. गावच्या वनव्यवस्थापन समितीने यासंदर्भात वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला.Trees were cut down in 50 acres of forest in Gadchiroli

जमिनीत पुरुन ठेवलेली सगळी लाकडे जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. हा संपूर्ण प्रकार आठ दिवस या जंगलात सुरू होता. आता यासंदर्भात गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची दोन मुले अशा एकूण 4 जणांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलझेले कुटुंबीय सध्या फरार झाले आहे. मात्र, या संदर्भात एकाही वनकर्मचा-यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्धार केला आहे. मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी याबाबत माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com