आदिवासी विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक!
आदिवासी विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक!भूषण अहिरे

आदिवासी विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक!

साम टीव्हीने आदिवासी बालकांच्या कुपोषणासंदर्भात बातमी प्रसारित केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी उद्या नंदुरबारमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

धुळे : साम टीव्ही वृत्तवाहिनीने आदिवासी बालकांच्या कुपोषणा संदर्भात बातमी प्रसारित केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी उद्या नंदुरबार येथे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. Tribal Development Minister calls emergency meeting!

हे देखील पहा -

सध्या कुपोषित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती.आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचा आज धुळे दौरा पार पडला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर या गावात आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासी विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक!
Heavy Rain | अलिबाग-रामराज रस्त्यावरील सहाण येथे रस्ता खचला

यावेळी पत्रकारांशी बोलताना आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी कुपोषित बालकांच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली असल्याचे स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com