पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष; कडाक्याच्या थंडीतही चिमुकल्यांसह आंदोलन

पाणी ही मुलभूत गरज असून सरकारने त्याची व्यवस्था नागरिकांसाठी करायची असते. मात्र आदिवासी बांधवांनी स्वतः विहीर खोदण्याचं काम सुरु केलं तर वन विभागाने ते थांबवलं.
पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष; कडाक्याच्या थंडीतही चिमुकल्यांसह आंदोलन
पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष; कडाक्याच्या थंडीतही चिमुकल्यांसह आंदोलनसंजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा चाळीस टापरी या गाव परिसरातील 200 ते 250 आदिवासी समाजातील बांधव गेल्या 50 वर्षांपासून वास्तव्यास आहे. परंतु आजही त्यांना पिण्याच्या पाण्याची कायम सोय नसल्यामुळे दरवर्षी पाणी संकट भेडसावत असते. या गावातील आदिवासींनी निर्णय घेऊन गावात एक विहिरच खोदकाम सुरू केलं असता त्यावर वन विभागाने आक्षेप घेत काम बंद पाडलं, यावर गावातील आदिवासी संतप्त झाले आहेत. (Tribal women's struggle for water; agitation with childs even in extreme cold)

हे देखील पहा -

दरम्यान, प्रशासनाच्या सततच्या दिरंगाई आणि आश्‍वासन धोरणाला कंटाळून जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या कार्यालयात सायंकाळ पासून परिवार व लहान मुलांसह या आदिवासीं महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनात लहान मुलांसह महिलांचा समावेश असून, सोमवारी सकाळपर्यंत सदर आंदोलन सुरूच आहे. पाणी ही मुलभूत गरज असून सरकारने त्याची व्यवस्था नागरिकांसाठी करायची असते. मात्र प्रशासनाने पाण्याची व्यवस्था केली नाही आणि या आदिवासी बांधवांनी स्वतः विहीर खोदण्याचं काम सुरु केलं तर वन विभागाने ते थांबवलं. मग अशात या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार अशी विचारणा होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com