Accident: उदगीरमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

दुचाकी चालकाची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.
Accident, Palghar
Accident, PalgharSaam tv

लातूर - जिल्ह्यातील उदगीरपासून सात किलोमीटर अंतरावर अहमदपूर रोडवर एका ट्रक चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जानवळ येथील दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला आहे. तर दुचाकी चालकाची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

उदगीर ते अहमदपूर रोडवरील हकनकवाडी पाटी ते तोंडार पाटीच्या दरम्यान उदगीरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विजय बाबुराव राठोड हे जागेवरच ठार झाले. तर दुचाकी वरील मयत विजय राठोड यांच्या पत्नी रेणुका राठोड या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

चाकूर तालुक्यातील जानवळ येथील राठोड दांम्पत्य काही कामानिमित्त उदगीरला येत होते. परंतु उदगीर जवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रक चालकाने राठोड यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. घटनास्थळावरून ट्रक चालकाने ट्रकसह पळ काढला होता.

Accident, Palghar
मराठी शाळाच भारी! अमेरिकेतल्या मुलाला जिल्हा परिषद शाळाच्या शिक्षणाची भुरळ

परंतु उदगीर ग्रामीण पोलिसांनी ट्रक सह चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शामराव लक्ष्मण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com