बारामती-पाटस रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; पती पत्नी जागीच ठार!

बारामती पाट्स रस्त्यावरील घटना!
बारामती-पाटस रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; पती पत्नी जागीच ठार!
बारामती : ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; पती पत्नी जागीच ठार!मंगेश कचरे

बारामती : बारामती-पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्याजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडकी दिली आहे. या अपघातात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या जोडप्याचा ट्रकखाली चिरडून जागीच अंत झाला आहे. काळूराम गणपत लोंढे आणि शाकूबाई काळूराम लोंढे असे या अपघातात मरण पावलेल्या पती पत्नीचे नाव आहे.

हे देखील पहा :

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास माल ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी स्पेलंडर क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती.

बारामती : ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; पती पत्नी जागीच ठार!
नांदेड दंगल प्रकरण; आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची! पहा Video
बारामती : ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; पती पत्नी जागीच ठार!
Viral Video : डोंबिवलीत भर रस्त्यात एकाला दांडक्याने जबर मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

यावेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रॅकवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने या ट्रकने थेट दुचाकीस समोरील चाकांखाली चिरडले यात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर दोघेही पळून गेले असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com