Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV

Vedanta Foxconn : वेळ पडल्यास दिल्लीत जा पण..., 'वेदांता'वरून अजित पवारांचा शिंदेंना सल्ला

वेदांता समूहाशी बोलून त्यांच्याकडे महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar On Vedanta Foxconn : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. जवळपास पावणेदोन लाख कोटींचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधक आक्रमक झालेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांताबाबत एक सल्ला दिलाय. वेळ पडल्यास दिल्लीत जा, पण वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात परत आणण्याचा आग्रह धरा असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar News Today)

Ajit Pawar Eknath Shinde
'वेदांता'नंतर महाराष्ट्राला दुसरा धक्का; आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला!

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यानिमित्त त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी वेदांता प्रकल्पाबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सल्लाही दिला. 'इथे राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही काहीही करा, यासंदर्भात वेदांता समूहाशी बोलून त्यांच्याकडे महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून राज्यात मोठी गुंतवणूक होणार होती. त्यामुळे महाराष्ट्राला प्रचंड वस्तू व सेवा कर (GST) मिळणार होता. सध्याच्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. अशावेळी तब्बल दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे'. असं अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. (Eknath Shinde Todays News)

दरम्यान, महाराष्ट्रात वेदांता समूहाकडून ६० टक्के आणि फॉक्सकॉन ४० टक्के अशा जॉईंट व्हेंचरमध्ये ही गुंतवणूक होणार होती. तळेगावच्या जागेत या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी इकोसिस्टम, कनेक्टिव्हिटी, मनुष्यबळ आणि राज्याचे पोषक औद्योगिक धोरण अशा सर्व गोष्टी अनुकूल होत्या. त्यामुळे वेदांता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून प्रकल्पासाठी तळेगावची निवड केली होती. मात्र, त्यानंतर राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला, असा आरोप अजित पवार यांनी केला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com