Navratri : भाविकांनाे ! तुळजाभवानीच्या दर्शनास जाणार आहात ? वाचा महत्वपुर्ण निर्णय

कोविडचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे तुळजापूरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival
tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festivalsaam tv

- कैलास चाैधरी

Tulja Bhavani Mandir : तुळजापुरात (tuljapur) नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सध्या मंदिर आणि परिसराची साफसफाई सुरु आहे. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु आहेत. याबराेबरच आकर्षक विद्युत रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यंदा उत्सव माेठ्या उत्साहात आणि जल्लाेषात साजरा करण्यासाठी भाविक आतूरलेले आहेत. (Navratri Festival 2022 Latest Marathi News)

गेली दाेन वर्ष काेराेनाच्या निर्बंधांमुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. आता निर्बंध उठले आहेत. त्यामुळे यंदाच्या उत्सवासाठी (navratri festival) तुळजापूरात भाविकांची माेठी गर्दी हाेणार असल्याचे स्पष्ट आहे. तुळजापूर शहरात हाेणारी गर्दी लक्षात घेता पाेलिसांच्यावतीने बॅरिगेट्स लावण्याचे काम सुरु झाले आहे.

येत्या 26 सप्टेंबर पासून तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. हा उत्सव अश्विनी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. यादरम्यान दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात. यंदा भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तुळजाभवानी मंदिर (tuljabhavani mandir) तब्बल 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival
Navratri : मनसेची ५० खाेके बक्षीस याेजना; रास दांडियात जिंकल्यास सुरत, गुवाहाटी, गोवा टूर

गेली दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना नवरात्रात तुळजाभवानीचे दर्शन घेता आले नाही. मात्र यावर्षी कोविडचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मंदिर बावीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेऊन नवरात्र उत्सवाची प्रशासनानं तयारी सुरू करुन भाविकांना आनंदाची बातमी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com