महाराष्ट्राला हादरवणारी घटना! ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, गुप्तांगावर ब्लेडने वार

पीडीत मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक.
Tuljapur Crime
Tuljapur CrimeSaam TV

प्राची कुलकर्णी -

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) येथील सिंदफळ गावात एका सहावर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करुन मुलीच्या गुप्तागावर नराधम आरोपीने वार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

पीडीत मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

भंडाऱ्यातील (Bhandara) प्रकरणामध्ये संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता असाच प्रकारची धक्कादायक आणि क्रुर घटना आता तुळजापूमध्ये घडली आहे. वासनांध नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पाहा व्हिडीओ -

गावकऱ्यांनी आरोपी संतोष वडणे (वय 35 ) राहणार माळुब्रा ता. तुळजापूर या पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी वडणे हा पहिल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर याआधी देखील अनेक गुन्ह्ये नोंद असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

सदरील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी पीडितेच्या कुटुंबास तात्काळ भेट देऊन प्रशासनास आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेण्याची सुचना केल्या आहेत.

रुपाली चाकणकरांनी घेतली गंभीर दखल -

Tuljapur Crime
Beed Crime News : भररस्त्यावरून मुलीचं अपहरण, कॉफी सेंटरमध्ये बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

तर या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली असून याबाबत त्यांनी आपल्या ट्विटद्वारे माहिती दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक केलेली असून या आरोपीने मुलीवर ब्लेडने देखील वार केलेले आहेत. मुलीवर उस्मानाबाद सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आपले उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले असून त्यांना आरोपीवर योग्य ती कडक कारवाई व्हावी असे निर्देश दिले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा याबाबतच्या सूचना दिल्या असून ही घटना अत्यंत गंभीर असल्याचं चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com