खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी तुळजापूर बंदची हाक

Tuljapur Bandh : संभाजीराजे अवमान प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत तुळजापूरची बंदची हाक दिली आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी तुळजापूर बंदची हाक
BJP MP Sambhaji Raje BhosaleSaam Tv

तुळजापूर : भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Bhosale) सध्या उस्मानबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंगळवारी संभाजीराजे हे तुळजाभवानी (Tulja Bhavani) मंदिरात गेले, मात्र त्यावेळी त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे तुळजापुरात (Tuljapur) एकच खळबळ उडाली. छत्रपती घराण्यातील सदस्याला गाभाऱ्यात जाण्याची परवानगी आहे. परंपरेनुसार छत्रपती घराण्यातील सदस्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी कोणाची अनुमती लागत नाही, अशी शेकडो वर्षांची परंपरा आहे. तरीही रोखल्याने दर्शनास आलेले संभाजीराजे देखील संतापले होते. त्यानंतर त्यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रकरणावर आता मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत उद्या तुळजापूरची बंदची हाक दिली आहे. त्यामुळे तुळजापुरातील वातावरण आणखी तापले आहे.

तुळजाभवानी मंदिरात छत्रपती घराण्यातील सदस्याला विनाअनुमती गाभाऱ्यात जाण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही. या प्रथेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र, मंगळवारी छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जाऊ न दिल्याने एकच खळबळ उडाली होती. खासदार संभाजीराजे यांनीही मंदिर प्रशासनावर तीव्र नाराजी दाखल केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करूनही सुनावले होते. त्यानंतर मंदिर प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, या प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक भूमिका घेत मंदिर तहसीलदार व व्यवस्थापक यांच्या कारवाईच्या मागणीसाठी उद्या तुळजापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज व तुळजापूरकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

BJP MP Sambhaji Raje Bhosale
पोलिसांविरोधात सोशल मीडियावर लिहिणं पडलं महाग; आप नेत्याविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे हे दरवर्षी न चुकता मातेच्या दर्शनाला येत असतात. संभाजीराजे परंपरेनुसार गाभाऱ्यातच जाऊन दर्शन करतात. दर्शनासाठी आल्यावर माता तुळजाभवानी यांची आरती संभाजीराजेंच्या हस्ते होत असते. चार महिन्यांपूर्वी देखील संभाजीराजे मंदिरात येऊन गेले होते. मात्र, संभाजीराजेंना मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी मंदिराच्या बाहेर पडत संभाजीराजेंनी जिल्हाधिकारींना फोन करून झापलं होतं. त्यानंतर आता संभाजीराजेंच्या अवमानप्रकरणी तुळजापूरमधील ग्रामस्थही संतप्त झाले आहेत

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.