विकास कामांची माहिती घेऊन 'तुतारी एक्सप्रेस' सिंधुदुर्गात

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचे फलक तुतारी एक्सप्रेसवरच 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या महिन्याभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Train
Train विनायक वंजारे

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विकास कामांची माहितीचे फलक दर्शवणारी 'तुतारी एक्सप्रेस' आज प्रवाशांसह सिंधुदुर्गात (Sindhudurg) दाखल झाली होती. दोन वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती 'तुतारी'च्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रेल्वेच्या डब्यांचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. कोल्हापूर-गोंदिया (Gondia) या सारख्या लांब पल्ल्यांच्या पाच एक्सप्रेस गाड्यांव्दारे ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचणार आहे.

हे देखील पहा -

राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 'आपला महाराष्ट्र आपले सरकार' ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोरोना काळात देण्यात आलेले प्राधान्य, शेती, क्रीडा, सामाजिक या क्षेत्राबरोबरच कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग विमानतळ, उद्योग, पर्यटन, सागर संपत्ती, चक्रीवादाळ बाधीत मच्छिमारांना 28 कोटी रुपयांची मदत, चक्रीवादळ बाधीत फळबागांसाठी पुनःलागवड व पुनःरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात यासह वेगवेगळ्या आघाडीवर झालेली प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या महिन्याभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com