जुळ्यांचा नादच खुळा! दहावीच्या परीक्षेत मिळवले एकसारखेच गुण

मुंबईतील भांडूपच्या दोन जुळ्या भावांना दहावीच्या परीक्षेत एकसारखेच गुण मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Twin Brothers got same marks in SSC Exam
Twin Brothers got same marks in SSC Examsaam tv

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल ९६.९४ % इतका लागला. यंदा कोकण विभागाने बाजी मारली असून नाशिक शेवटच्या स्थानी आहे. अशातच मुंबईतून (Mumbai) आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भांडूपच्या दोन जुळ्या भावांना (Twin Brothers) दहावीच्या परीक्षेत एकसारखेच गुण मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Twin Brothers got same marks in SSC Exam
पंड्या-कार्तिकची चौफेर फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला १७० धावांचं आव्हान

सौरभ धनाजी ढगे (Saurabh dhanaji dhage) आणि साहिल धनाजी ढगे (Sahil dhanaji dhage) अशी या जुळ्या भावांची नावं आहेत. या दोघा जुळ्या भावांनी केलेली कमाल पाहता त्यांच्या कुटुंबीयांनी घरात धमाल केली आहे. या दोघांना दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सौरभ आणि साहिल या जुळ्यांना ८७.२० टक्के एकसारखेच गुण (Same marks) मिळाले आहेत. त्यामुळे या जुळ्या भावांची सर्वत्र तुफान चर्चा सुरु आहे.

Twin Brothers got same marks in SSC Exam
दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाही, हताश होऊ नका, शिक्षणमंत्री म्हणाल्या...

कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. (SSC Exam Result 2022 news updates) यंदा १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. आनंदाची बाब म्हणजे यंदा राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के इतका लागला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com