आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली शेकडो रुग्णांना लाखोंचा गंडा; २ बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या

आयुर्वेदिक औषधांद्वारे सांधेदुखी चांगली करून देतो असं आमिष दाखवून, प्रत्येक रुग्णांकडून २०० रुपये घेऊन त्यांना हे दोघे औषध देत होते.
आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली शेकडो रुग्णांना लाखोंचा गंडा; २ बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या
Ayurvedikसंजय जाधव

बुलडाणा : बुलढाणा शहराच्या (Buldhana City) मध्यवर्ती भागात एक स्टॉल लावून आयुर्वेदिक जडीबुटीचा उपयोग करुन सांधेदुखी चांगली करतो असा विश्वास रुग्णांना देऊन त्यांना औषधे देणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना बुलढाणा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही डॉक्टर हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बुलढाण्यात मध्यवर्ती भागात दोन बोगस डॉक्टरांनी अनेक रुग्णांना आयुर्वेदिक (Ayurvedic) औषधाने सांधेदुखी चांगली करून देतो असे आमिष दाखवून, प्रत्येक रुग्णांकडून 200 रु घेऊन त्यांना हे दोघे औषध देत होते. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही पत्रकारांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ स्टॉलच्या ठिकाणी पोहचले व या दोन बोगस डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जडिबुटी सदृश औषधी ताब्यात घेतली.

Ayurvedik
घरच्यांचा दावा बाल संरक्षण समितीने खोडला; जन्मतारखेचा दाखला देत बालविवाह रोखला

दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (Taluka Medical Officer) तक्रारीवरून या दोन्ही बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे , विनोद शर्मा व कपिलकुमार सुशीलकुमार अस या दोघांचं नाव असून ते हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जिल्ह्यातिल ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांना सुज्ञ नागरिकांनी दिली होती. मात्र, कुठेही या माहितीची दखल घेतल्या गेली नाही शेवटी पत्रकारांच्या लक्षात ही बाब दिसून आली त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला कळविले व त्यानुसार जिल्ह्यात पहिली कारवाई बोगस डॉक्टरांवर करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.