ह्रदयद्रावक | विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

जनावरांसाठी चारा बारीक करीत असतांना शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ह्रदयद्रावक | विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू
ह्रदयद्रावक | विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू!लक्ष्मण सोळुंखे

जालना : जनावरांसाठी कुट्टी मशीन मधून चारा बारीक करीत असतांना अचानक विजेचा (Electric Shock) प्रवाह मशीन मध्ये उतरल्याने जोरदार शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची ह्रदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात घडली आहे. Two brothers die of electric shock

हे देखील पहा-

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घडली आहे . पवन गजानन घोडे (वय 22), सचिन रामकीसन घोडे (वय 23) असे या घटनेत मृत्यु झालेल्या दोन चुलत भावांचे नाव असून घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सोनी दोघांना दोघांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

ह्रदयद्रावक | विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू!
धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्या

दरम्यान सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत मात्र शेतकऱ्यांचा कोणत्यातरी कारणाने वीजेशी संपर्क हा येतच असतो अशात प्रतेक शेतकऱ्यांनी तसेच घरगुती काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी ज्य़ांचा संपर्क वीजेशी येतो अशा सर्वांनी काळजी घ्यायला हवी अन्यथा आपल्या नजर चुकीमुळे आपल्या मोठी इजा होऊ शकते प्रसंगी वाईट प्रसंगही ओढावू शकतो.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com