नागपुरातील 'त्या' ब्लड बँकेतील रक्ताने दोन मुलांना 'हॅपीटायटस बी-सी'ची लागण

डॉक्टर विक्की रुगवानी यांनी अशा रुग्णांना ‘नॅट टेस्टेड ब्लड' देण्यात यावे अशी मागणी केलीय.
Nagpur
Nagpur Saam TV

नागपूर: नागपूरात तीन वर्षांच्या मुलीला ब्लड बँकेतून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. आता अशा प्रकारच्या ब्लड बँकेतून रक्त दिलेल्या आणखी दोन मुलांना हॅपीटायटस बी आणि सी झाल्याचं पुढं आलं आहे. थॅलेसेमिया आजार असलेल्या रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावं लागतं. सरकारकडून थॅलेसेमियाच्या रुग्णांना खासगी आणि सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त देण्यात येतं. मात्र, हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसतं. ‘नॅट टेस्टेड’ रक्त महाग असल्यानं ते गरीब रुग्णांना परवडत नाही.

त्यामुळं या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर विक्की रुगवानी यांनी अशा रुग्णांना ‘नॅट टेस्टेड ब्लड' देण्यात यावे अशी मागणी केलीय. ज्यावेळी रक्तदान करणारा रक्तदान करतो त्यावेळी त्याच्या सगळ्या चाचण्या केल्या जातात. मात्र त्या चाचण्या शंभर टक्के रिझल्ट देत नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडतात. ‘नॅट टेस्टेड’ ब्लड असेल तर हा धोका जवळपास नसतो. त्यामुळं सरकारी आणि खाजगी ब्लड बँकांमध्ये ‘नॅट टेस्टे’ व्हावी आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांना हे रक्त मोफत दिलं जावं, अशी मागणी डॉ. रुघवणी यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com