हिंगणघाटमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, पोलीस असल्याचं सांगून भररस्त्यात वृद्धाला लुटलं

पोलीस असल्याचं सांगून दोन चोरट्यांनी एका वृद्धाला लुटल्याची घटना घडलीय.
hinganghat police station
hinganghat police stationsaam Tv

चेतन व्यास

हिंगणघाट : येथे चोरट्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस असल्याचं सांगून दोन चोरट्यांनी एका वृद्धाला लुटल्याची घटना घडलीय. रस्त्यावरून चालत जात असताना एका वृद्धाला दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी (fake Police) पोलीस असल्याचं सांगितलं. त्यानंतर वृद्धाकडे असलेली पैशांची पिशवी लंपास करून ५० हजरांची (Robbery) चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना हिंगणघाट येथील चौधरी चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हिंगणघाट पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Hinganghat robbery latest News Update)

hinganghat police station
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे नाव काय असणार? मुख्यमंत्र्यानी घेतला 'हा' निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपूर येथील बबन माधव जवादे (वय ६५) यांची प्रकृती खराब असल्याने ते हिंगणघाटील रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आले होते. त्यांच्याजळ ३० हजार रुपयांची रोख रक्कम होती.मात्र,आणखी पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले आणि तेथून २० हजार रुपये काढले. त्यानंतर ते पोस्टातून बाहेर पडत रस्त्याने चालत निघाले.

hinganghat police station
Viral Video : धावत्या ट्रेनच्या खिडकीत लटकणाऱ्या चोराचा जीव अर्ध्यावरच लटकला, पाहा कसा ते...

त्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला थांबवले. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने धूम ठोकली.बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नसल्याने त्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com