भरधाव ट्रकने बैलगाडीला ठाेकरले; शेतकऱ्यांना मृत्यूने कवटाळले
accident

भरधाव ट्रकने बैलगाडीला ठाेकरले; शेतकऱ्यांना मृत्यूने कवटाळले

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-आलापल्ली मार्गावर भीषण अपघात झाला. कळमना गावाजवळ झालेल्या अपघातात दोन शेतकरी व एक बैल जागीच ठार झाला. भरधाव वेगातील सिमेंट भरलेल्या ट्रकने बैलगाडीला धडक दिली. हे शेतकरी आपल्या बैलगाडीने शेतावर निघाले होते. two-farmers-died-in-chandrapur-ballapur-allapali-accident-marathi-news-sml80

accident
टोमॅटोचा दर दुप्पटीने वाढला; गृहिणींचे मंडईचे बजेट काेलमडले

अंबादास दूधकोहळे (वय ५७) आणि पुंडलिक शंकर काळे (वय ५५) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-्यांची नावे आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी महामार्गावरील वाहतुक रोखून धरली. त्यानंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

दरम्यान पाेलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर महामार्ग वाहतुकीस मोकळा झाला. या मार्गावर गतिरोधक तयार न केल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.