Viral News:दोन मित्रांना जेवण बनवणे पडले महागात; फोडणी देताना संपूर्ण टोपाला आग

फोडणी तयार झाल्यावर त्याचा मित्र टोपाचे झाकण उघडतो आणि दुसरा लगेच तयार केलेली फोडणी त्यात टाकतो.
Viral News
Viral NewsSaam TV

Viral News: कधीतरी चुकून किचनमध्ये गेल्यावर जेवण बनवताना सर्वांचीच फजीती होते. मुलगी असो अथवा मुलगा घरापासून दूर रहायला गेल्यावर प्रत्येकालाच जेवण बनवावे लागते. अशात सोशल मीडियावर जेवण बनवतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुलांनी जेवण बनवताना अशी काही फोडणी दिली की, संपूर्ण टोपाला आग लागलेली दिसत आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायर होत आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलं जेवण बनवताना दिसत आहेत. शेजारी एका मोठ्या टोपात डाळ ठेवली आहे. तर एक तरुण गॅसवर फोडणी देण्यासाठी तेल तापवत आहे. फोडणी तयार झाल्यावर त्याचा मित्र टोपाचे झाकण उघडतो आणि दुसरा लगेच तयार केलेली फोडणी त्यात टाकतो.

Viral News
VIRAL VIDEO: अरेच्चा! मध्य प्रदेशात बकरी ऐवजी बोकडांनी दिलं दूध; गावभर अनोख्या बोकडांची चर्चा

आता फोडणी दिली की मस्त जेवायला बसू असा विचार करणाऱ्या या मुलांची चांगलीच फजीती होते. फोडणी देत असताना तेल इतके तापते की, टोपात टाकल्यावर संपूर्ण टोपभर आग पसरते. त्यामुळे दोघेही घाबरून मागे पळतात. ही आग इतकी मोठी असते की एका क्षणासाठी स्फोट झाला आहे असे वाटते. सोशल मीडियावर फ्लर्टींग बॉय या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Viral News
Viral News : मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर अन् आईने ठोकली प्रियकरासोबत धूम, दागिनेही केले लंपास

व्हिडिओला ( Video) आता पर्यंत १.४ मिलियन व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच ८५ हजार लाईक्सचा वर्षाव यावर करण्यात आला आहे. एका युजरने यावर कमेंटकरत लिहिले आहे की, जर फोडणी देता येत नसेल तर या भावाकडून शिकून घ्या. तसेच अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com