कर्नाटकच्या दाेन ट्रकवर पाेलिसांचा छापा; ३४ लाखांचा गुटखा जप्त

कर्नाटकच्या दाेन ट्रकवर पाेलिसांचा छापा; ३४ लाखांचा गुटखा जप्त
Crime SaamTvNews

बीड : मांजरसुंबा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेल्या दोन ट्रक पकडले आहेत. कर्नाटक येथुन बीडकडे धुळे-सोलापूर महामार्गावरून दोन ट्रक गुटखा भरून येत असल्याची माहिती ए.एस.पी पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी दोन्ही ट्रक मांजरसुंबा येथून ताब्यात घेतले. या दोन्ही ट्रकमध्ये तब्बल ३४ लाखांचा गुटखा आढळून आला. two-ghutkha-trucks-seized-by-police-beed-crime-news-sml80

Crime
कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

कर्नाटक राज्यातील बसवकल्याण या ठिकाणाहून ट्रक क्रमांक केए ५६- ११६७ आणि केए ५६-०७११ मधून गुटखा भरून बीडकडे धुळे-सोलापूर महामार्गावरून येत होता. यावेळी ए.एस.पी पंकज कुमावत यांच्यासह कर्मचार्‍यांनी ट्रक थांबवून त्याची पाहणी केली. त्यात गुटखा असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रक ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत तब्बल ३४ लाखांच्या गुटख्यासह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित चार आरोपींना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com