मटनाचे पैसे मागितले म्हणून दोन गटात हाणामारी; तीन गंभीर जखमी

Jalna Crime News : मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
two group fight between over a payment of mutton in jalna
two group fight between over a payment of mutton in jalna Saam tv

जालना : मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी (Fight) झाल्याची घटना घडली आहे. जालना (Jalna) शहरात झालेल्या या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे. जालना शहरातील काद्राबाद परिसरातील मटनाच्या दुकानात सदर घटना घडली आहे. शहरातील काद्राबाद परिसरात सिद्दीक अख्तर कुरेशी यांचं मटनाचं दुकान आहे. सदर घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Jalna Latest Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

नेमक काय घडलं ?

जालना शहरातील काद्राबाद परिसरात सिद्दीक अख्तर कुरेशी यांचं मटनाचं दुकान आहे. त्याच परिसरात सागर दोडके राहतो. त्याचे कुरेशी यांच्याकडे मटनाचे पैसे बाकी होते. त्यामुळं सिद्दीक कुरेशी यांनी त्याला मटनाची उधारी मागितली. मात्र, मटनाचे पैसे मागितल्याच्या राग हा सागर दोडकेला आला. त्यानंतर त्याने काही जणांना सिद्दीक यांच्या मटनाच्या दुकानात घेऊन आला. त्यानंतर त्यानं दुकानमालक सिद्दीक कुरेशी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सागरच्या गटानं त्यांच्याकडीलच तीक्ष्ण हत्यारानं तिघांना जखमी केलं. या हल्ल्यात सिद्दीक यांच्यासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमी व्यक्तींवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

two group fight between over a payment of mutton in jalna
बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दरम्यान, जालन्यात शुक्रवारी दोन गटात दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी २०-२५ आरोपींना अटक केली आहे. भोकरदन तालुक्यातील चांदई गावात कमानीवर नाव देण्यावरून हा वाद झाला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी या गावातील सरंपच आणि उपसरंपच यांनाही अटक केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com