धक्कादायक! कळमनुरी शहरात मध्यरात्री दोन गट एकमेकांना भिडले

शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत युवकांनी रस्त्यावर तलवारी मिरवत हवेत गोळीबार.
धक्कादायक! कळमनुरी शहरात मध्यरात्री दोन गट एकमेकांना भिडले
धक्कादायक! कळमनुरी शहरात मध्यरात्री दोन गट एकमेकांना भिडलेसंदीप नागरे

हिंगोली - कळमनुरी शहरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत, शुल्लक कारणावरून दोन गट एकमेकांना भिडले या राड्यात एका गटाकडून रस्त्यावर तलवारी फिरवत गावठी कट्ट्या मधून गोळीबार करण्यात आल्याची माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटने नंतर संपूर्ण कळमनुरी शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करत, दहशत माजवणाऱ्या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, सध्या हिंगोली पोलीस दलाने कळमनुरी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेत आरोपींनी हातात तलवार घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण केल्याचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्याने कळमनुरी शहरात कायद्याचे राज्य आहे की गुंडाचे असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com