चंद्रपूर शहरालगत भीषण अपघात, दोन मजूरांना ट्रकने चिरडले

घुग्घुस - वणी मार्गावर आयव्हीआरसीएल ( IVRCL) या कंपनीचे महामार्ग डागडुजीचे काम सुरू असताना एका भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले.
चंद्रपूर शहरालगत भीषण अपघात, दोन मजूरांना ट्रकने चिरडले
Accident NewsSaam tv

चंद्रपूर: चंद्रपूर शहरालगत घुग्घुस - वणी मार्गावर आयव्हीआरसीएल ( IVRCL) या कंपनीचे महामार्ग डागडुजीचे काम सुरू असताना एका भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले. यात दोन मजूर जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. घुग्घुस-वणी राज्य महामार्ग क्रमांक सातवरील पुनवट गावाजवळ कंपनीचे मजूर डागडुजी कार्यात व्यस्त होते. ट्रॅक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते.

अश्यात वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले. यात बेलोरा आणि मारेगाव येथील मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सिरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठले. जखमीना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महिन्यात या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.