सावधान! अकोल्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; तब्बल दोन महिन्यानंतर आढळला रुग्ण

Akola Corona Updates : अचानक कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Akola Corona
Akola CoronaSaam TV

अकोला : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा अकोला (Akola) शहरात पाऊल ठेवलं आहे. शहरातील एका संदिग्ध रुग्णाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. संबंधित रुग्ण हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत एक ज्येष्ठ नागरिक असून महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहेत. अचानक कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. (Akola Corona Updates)

Akola Corona
भयंकर! शुटिंगच्या बहाण्याने प्रसिद्ध गायिकेला अज्ञातस्थळी बोलावलं; त्यानंतर...

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाची प्रकृती सध्या ठीक असून 5 दिवसानंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करणार आहे. एका खासगी प्रयोगशाळेतून सबंधित रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. काही दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त असला, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर नमुन्यांची चाचणी सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी 32 जणांचे कोरोना तपासणी अहवाल आले. यामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून इतर 31 रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 65,180 इतकी झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com