शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत.
शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना
Shivsena News, Maharashtra Political Crisis NewsSaam TV

मुंबई - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. (Maharashtra Political Crisis News)

शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता आसामला हलवला आहे. कालपासासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे शिवसेना (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता गुजरातमधील हॉटेलमधून आपल्यासोबतच्या सर्व बंडखोर आमदारांना घेऊन आज सकाळी ७ वाजता गुहावाटी (Guwahati) येथे पोहचले आहेत.

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता आणखी दोन आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आणि आमदार संजय राठोड यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत.

Shivsena News, Maharashtra Political Crisis News
मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

शिंदे यांनी आपला मुक्काम हलवल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकीकडे आमच्या शिवसेनेने असे अनेक बंड पचविल्याचा दावा मातोश्री समर्थक शिवसेना नेते म्हणत आहेत. तर आता आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यभरातील आणि विशेषत: मुंबईमधील शिवसैनिकांना आता कोणाचं हिंदुत्व भावणार आणि कोणत्या शिवसेनेच्या कोणत्या गटाला ते पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com