Viral Video : ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोन तरुणांची एसटी चालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

एसटी चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ST Bus Travel
ST Bus Travel Saam Tv

रायगड : एसटी बलचालकाने ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोन दुचाकीस्‍वारांनी एसटी बसचालकाला बेदम मारहाण केली. ही धक्कादाय घटना पेण तालुक्‍यातील रामवाडी या ठिकाणी घडली. दोन तरूण बस चालकाला मारहाण करत असताना बघ्यांची एकच गर्दी जमली होती. त्यावेळी एका तरुणाने या थरारक घटनेचे चित्रण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (two persons beats st bus driver viral video update)

स्थानिक नागरिकांनी या घटननेची माहिती पोलिसांनी (Police) दिल्यावर जखमी झालेल्या बसचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वप्नील भगत असे या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी चालकावर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

ST Bus Travel
...यात्रा पर निकला है हमारा शेर; चित्ता प्रोजेक्टवरून काँग्रेसचा PM मोदींवर निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक स्वप्नील भगत पनेवल-अलिबाग मार्गावर बस घेवून जात असताना रामवाडीजवळ दुचाकीस्वारांना ओव्हरटेक करण्यावरून वाद निर्माण झाला. याचदरम्यान एसटीच्या वाहकाने चालकाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण वाहकावरही तरुणांनी हल्ला केला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालक भगतला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com