Wardha Crime : दुपट्ट्यात दगड बांधून कैद्यावर केला हल्ला, कारागृहात तुंबळ हाणामारी

दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Wardha district jail
Wardha district jailsaam tv

चेतन व्यास

वर्धा : शिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. येथील वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बैरेक क्रमांक ८ मध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (Wardha District Jail latest Crime News)

या थरारक घटनेमुळं कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडालीय. मारोती वॉर्ड हिंगणघाट येथील कपिल नंदकिशोर आखाडे (२६) असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे. याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी शिक्षाधीन बंदीवान शेख तौफीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Wardha district jail
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीत; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

कपिल आखाडे आणि शेख तौफीक हे दोघेही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बैरेक क्रमांक ८ मध्ये स्थानबद्ध आहे. १४ रोजी बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शिक्षाधीन बंदी शेख तौफीक हा कपिल आखाडे याच्या बिछाण्यावर बसून होता. त्याचदरम्यान कपिल आखाडे जात असताना त्याचा धक्का शेख तौफिकला लागला. या कारणातून दोन्ही बंदीवानांमध्ये चांगलाचा वाद झाला होता.

१५ रोजी गुरुवारी कपिल आखाडे हा बैरेकमध्ये असताना शिक्षाधीन बंदी शेख तौफीक याने एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका दुपट्ट्यात छोटे छोटे दगडं बांधून कपिल आखाडेवर अचानक हल्ला चढविला. या घटनेने कारागृहातील इतर बंदीवानांसह कारागृह प्रशासनांत चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली.शहर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षाधीन बंदीवान शेख तौफीक याच्याविरुद्ध मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Wardha district jail
Team India : टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाला दुखापत, मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर

न्यायदीन बंदीवान कपिल आखाडे याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते. कारागृहात असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केला. त्याला तीन टाके पडल्याची माहिती आहे. शेख तौफीक शेख शाकीर याच्यावर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याने तो शिक्षा भोगत आहे. त्याची शिक्षा संपून कारागृहाबाहेर येण्यासाठी केवळ महिनाभर वेळ आहे. मात्र, कारागृहातच त्याने न्यायदिन बंदीवानावर हल्ला केल्यामुळे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com