बीड जिल्ह्यात महिलांचे मृतदेह विहिरीत आढळण्याच्या दोन समान घटना !

आष्टी शहरातील एका विहिरीमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला तर धारुर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरातील विहिरीत एका 24 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे.
बीड जिल्ह्यात महिलांचे मृतदेह विहिरीत आढळण्याच्या दोन समान घटना !
बीड जिल्ह्यात महिलांचे मृतदेह विहिरीत आढळण्याच्या दोन समान घटना !SaamTv

बीड : बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. आष्टी शहरातील एका विहिरीमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला तर धारुर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरातील विहिरीत एका 24 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे. या दोन्ही घटना आज एकाच दिवशी समोर झाल्या आहेत.

हे देखील पहा -

अनिता संदिप पाठक वय 45, रा. आष्टी, या महिलेचा आज शहरातील एका विहरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. तर दुसऱ्या घटनेत धारुर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरातील विहिरीत, शिवकन्या ज्ञानेश्वर आडे (वय 24) या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तर ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप, मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात महिलांचे मृतदेह विहिरीत आढळण्याच्या दोन समान घटना !
Crime । तब्बल १४ वर्षांनंतर संदीप मोहोळ खून प्रकरणाचा निकाल!

तर याप्रकरणी आष्टी पोलिसात मृत्यूची आकस्मात नोंद झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत शवविच्छेदन अहवालावरुन ही आत्महत्या की हत्या ? हे सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी पती ज्ञानेश्वर आडे यास ताब्यात घेतले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com