
कोल्हापूर: शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, "निवडणुकांबाबत (Elections) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन मतप्रवाह आहेत. काहींना नेत्यांना वाटतंय की आगामी निवडणूक काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेला (shivsena) सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा घेऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत. (Two streams of opinion in the NCP about contesting elections together; Sharad Pawar's big statement!)
हे देखील पाहा -
शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक १५ दिवसात जाहीर करा हा गैरसमज आहे असं ते म्हणाले. तसेच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले की, मला वाटतं या निवडणुक प्रक्रियेला दोन अडीच महिने लागत, जिथं थांबवलं तिथून सुरु करा असा कोर्टाचा आदेश आहे. कोर्टाच्या कोणत्याही बाबींवर खूप बोलण्यासारखं आहे पण तुम्हाला ही नोटीस येईल आणि मलाही येईल असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसही ओबीसी आरक्षण आहे त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
देशद्रोहाच्या कलमावर विचार करण्याची गरज - पवार
राजद्रोहाचं हे कलम १८९० साली इंग्रजांनी आणलं. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांसाठी हे कलम आणलं गेलं. आता आपण स्वातंत्र्य आहोत. त्यामुळे सरकाविरोधात बोलणं राजद्रोह असू नये असं मला वाटतं. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं दिसतंय असंही पवार म्हणाले.
अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय विषय नाही - पवार
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय विषय नाही. माझा नातूही (रोहित पवार) काल अयोध्येत होता हे मलाही माहित नव्हतं असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
मोदींविरोधात अजूनही चेहरा नाही - पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात अजूनही राजकीय विरोधक म्हणून एक ठोस चेहरा समोर आलेला नाही असं पवार म्हणाले. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षात एकमत होऊन एकच चेहरा लवकर समोर येईल असं वाटतं नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भूमिका आहेत असं पवार म्हणाले. त्याचप्रमाणे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनाही त्यांनी टोला लगावला आहे. प्रशांत किशोर यांना पक्ष काढू द्या, निवडणुका लढवू द्या म्हणजे निवडणूका काय असतात ते त्यांना समजेल असं पवार म्हणाले आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.