Accident News: मुंबई - नागपूर महामार्गावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने दिली जोरदार धडक; ट्रकचालक गंभीर जखमी

Buldhana News: या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीरित्या जखमी झाला आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv

Buldhana Accident News: बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा तालुक्यात आमसरी फाट्यावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीरित्या जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Accident News
Pune News: उच्चदाब वाहिनीवरुन केबल टाकण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; एकाचा मृत्यु, एक जखमी

नांदुऱ्या कडून खामगाव कडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकच्या केबिनचा पूर्ण चुराडा झाला असून ट्रक चालक गंभीरित्या जखमी झाला आहे. स्थानिकांनी तात्काळ या ट्रक चालकाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या या ट्रकचालकावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. (Accident News)

Accident News
Badlapur News: बदलापूरकरांसाठी गुड न्यूज; थेट पनवेल अन् जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार

मालवाहू ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार...

खामगाव चिखली रोड वरील लोखंडा फाट्याजवळ मालवाहू बोलेरो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातात दुचाकीस्वार रवींद्र जाधव याला उपस्थितांनी तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रवींद्र जाधव जानेफळ येथील असून ते खामगाव एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान दोन वाहनांमध्ये धडक झाल्यानंतर दुचाकीने पेट घेऊन दुचाकी जळून खाक झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com