Navi Mumbai Crime : नवी मुंबईत चाललंय काय? दिवसाढवळ्या गोळीबारात रिअल इस्टेट एजंटचा मृत्यू

नवी मुंबईत दिवसाढवळ्या रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime Saam tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतून मोठं वृत्त हाती आलं आहे. नवी मुंबईत दिवसाढवळ्या रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात रिअल इस्टेट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये ही घटना घडली आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील नेरूळमध्ये दिवसढवळ्या रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नेरुळमधील (Nerul) वर्दळीच्या रोडवर दिवसाढवळ्या रिअल इस्टेट एजंवर गोळीबार झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Navi Mumbai Crime
Crime News: संतापजनक! अश्लिल चित्रफित दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; पोलिसांनी केली अटक

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) नेरूळमध्ये दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी थेट दिवसाढवळ्या रिअल इस्टेट एजंटवर गोळीबर केल्याची प्रकार समोर आला आहे. रिअल इस्टेट एजंट आपल्या चार चाकीतून जात असताना गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सावजी भाय पटेल असे इस्टेट एजंटचे नाव आहे.

गोळीबारात इस्टेट एजंटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अधिक तपास सुरू केला आहे.

Navi Mumbai Crime
Crime News: धक्कादायक! कपाटात आढळला महिलेचा मृतदेह; मुलीनेच हत्या केल्याचा पोलिसांचा संशय

दरम्यान, दिवसाढवळ्या नेरुळ सारख्या भागात गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित आहे. गोळीबारात रिअल इस्टेट एजंटच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com