Sangali News: अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा दुचाकी अपघात; विहिरीत पडून प्रेयसीचा मृत्यू, सांगलीमधील हृदयद्रावक घटना

मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Sangli News: सांगली येथून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. एका उल्पवयीन प्रेमीयुगुलाचा मोठा अपघात झाला असून या घटनेत प्रेयसीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Latest Sangali News)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या तासगाव येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तरुण आणि तरुणी दोघेही तासगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये राहत होते. तालुक्याला एका ठिकाणी ते फिरण्यासाठी गेले होते. तिकडून घरी येताना त्यांना रात्र झाली.

त्यामुळे तरुण त्याच्या प्रेयसीला घरी सोडवण्यासाठी जात होता. दोघेही एका दुचाकीवरुन चालले होते. यावेळी रात्रीच्या अंधारात तरुणाला रस्ता निट दिसला नाही. त्यामुळे दुचाकीवरून त्याचा तोल गेला आणि गोघेही थेट विहिरीत पडले. मुलाला पोहता येत होते. त्यामुळे त्याने कसाबसा स्वत:चा जीव वाचवला.

मात्र प्रेयसीला त्याला वाचवता आले नाही. फिरुन घरी जाताना आपल्याबरोबर पुढे असे काही घडेल याची दोघांनाही काहीच कल्पना नव्हती. प्रेयसीला पोहता न आल्याने पाण्यातच गुदमरून तिचा मृत्यू झाला. जीच्यावर एवढं प्रेम केलं तिच्या मृत्यूने प्रियकर खूप दुखावला गेला. अशात मुलीच्या कुटुंबियांनी त्याच्या विरोधात सांगली पोलिसांत तक्रार दाखल केल्याने तो आणखीन खचून गेल्याचं म्हटलं जात आहे.

Crime News
Sangali News: मयत व्यक्तीच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब; एसबीआय बॅंकेतील खळबळजनक घटना उघडकीस

सदर घटनेत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत.या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशनमधून कळले असता भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोचली होती. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे व H.E.R.F रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे,अनिल कोळी, यांनी मृतदेह व मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com