दुचाकींची चोरी करणारी टोळी जेरबंद; अकरा दुचाकींसह तिघांना अटक...

पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांच्या ११ मोटरसायकली जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकींची चोरी करणारी टोळी जेरबंद; अकरा दुचाकींसह तिघांना अटक...
दुचाकींची चोरी करणारी टोळी जेरबंद; अकरा दुचाकींसह तिघांना अटक...जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील विविध भागातून मोटरसायकलांची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडुन लाखो रुपयांच्या ११ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. (Two-wheeler theft gang arrested; Three arrested with 11 two-wheelers)

हे देखील पहा -

स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता मुख्य आरोपी नथु सहदेव वानखडे याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार राहुल वानखडे आणि मनोज निंबाळकर या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांच्या ११ मोटरसायकली जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, मुकुंद देशमुख, दत्ता ढोरे, शेख हसन आदींनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.