दुर्दैवी! शेतातून घरी परतणाऱ्या चुलती-पुतणीवर काळाचा घाला; टेम्पोने दोघींना चिरडले

मंगल दवंगे आणि ठगनबाई दवंगे या दोघी शेतातून मोल-मजुरी करुन घरी पायी परतत होत्या.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam TV

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : शेतातून मोल-मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने उडवल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील (Vaijapur Taluka) मणुर येथे घडली आहे. या अपघातामध्ये दोघींचाही चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (वय ५६), मंगल आसाराम दवंगे (वय ३८) अशी या दोघी चुलती पुतनीची नावे आहेत.

Aurangabad News
धक्कादायक! पुलावर दुचाकी उभी करत तरुणाने घेतली नदीत उडी; शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल दवंगे आणि ठगनबाई दवंगे या दोघी शेतातून मोल मजुरी करुन घरी पायी परतत असताना साकेगावकडून मणुरकडे येणाऱ्या टेम्पोने या दोघींना जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) दोघी चुलती पुतनीचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालकाने आपले वाहन जागेवर सोडुन पळ काढला. घटनास्थळी शिऊर पोलीस (Police) दाखल झाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com