Nagpur: दोन वर्षीय बालकाचा नगरधनच्या तलावात बुडून मृत्यू
दोन वर्षीय बालकाचा नगरधनच्या तलावात बुडून मृत्यूSaamTv

Nagpur: दोन वर्षीय बालकाचा नगरधनच्या तलावात बुडून मृत्यू

शौर्य माहुले असे या दोन वर्षीय मृत बालकाचे नाव आहे.

नागपूर - रामटेक जवळील नगरधनच्या तलावात दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. शौर्य माहुले असे या दोन वर्षीय मृत बालकाचे नाव आहे. खेळता-खेळता हा मुलगा तलावात गेल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा -

नगरधन इंदिरानगर येथील शौर्य रविवारला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खेळता खेळता घराबाहेर निघून गेला. शौर्य दिसत नसल्याने गावात त्याचा सर्वत्र शोध घेण्यात. पण तो कुठेही आढळला नाही. शौर्य हरविल्याची चर्चा गावात सर्वत्र पसरली. दोन वर्षीय शौर्य हरविल्याची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली.

दोन वर्षीय बालकाचा नगरधनच्या तलावात बुडून मृत्यू
प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

शौर्यचा शोध घेत असतांनाकाही नागरिकांना एका लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तलावातून मृतदेह बाहेर काढले असता ते मृतदेह शौर्यचे असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यू नोंद केली आहे. पुढील तपास पीएसआय सीमा बेंद्रे करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com