वेगाशी कार स्पर्धा करण्याच्या नादात दोन तरुणी ठार

राशी यादव आणि भावना यादव अशी मृत तरुणींची नावे आहेत.
वेगाशी कार स्पर्धा करण्याच्या नादात दोन तरुणी ठार
वेगाशी कार स्पर्धा करण्याच्या नादात दोन तरुणी ठारSaam Tv

नागपूर - पार्टीवरून परत येत असताना वेगाशी स्पर्धा करणाऱ्या तरुणांची कार दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर झाडाला धडक देऊन एका घराच्या वॉलकंपाउंडवर धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन मित्र मात्र बचावले आहेत. अमरावती मार्गावरील भरतनगर चाैकाजवळ रविवारी रात्री 10.40 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राशी यादव आणि भावना यादव अशी मृत तरुणींची नावे आहेत.

हे देखील पहा -

चिराग जैन आणि गिरिश लक्ष्मण रामलखानी अशी या किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.भावना यादव, राशी यादव, चिराग जैन आणि गिरिश हे चाैघे रविवारी रात्री वाडी समोरच्या अॅटमॉस्पेअर नामक रेस्टॉरेंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून हे चौघे रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ते नागपूरकडे परत येत होते. चिराग कार चालवित होता.गिरिश त्याच्या बाजुला बसला होता तर भावना आणि राशी मागच्या सिटवर बसल्या होत्या.

वेगाशी कार स्पर्धा करण्याच्या नादात दोन तरुणी ठार
अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!

कार वेगाशी स्पर्धा करीत होती. भरतनगर चाैकाजवळ कार आली तेव्हा काही क्षणासाठी चिरागचे लक्ष विचलित झाले आणि भरधाव कार दुभाजकावर आदळुन पलिकडच्या झाडावर धडकली. कारचा वेग एवढा जास्त होता की झाडावर धडकल्यानंतर देखील कार थांबली नाही आणि बाजुच्या घराच्या वॉल कंपाउंडवर धडकल्यानंतर कार थांबली. कारमध्ये बलून असल्याने चिराग अन् गिरिशला काही झाले नाही मात्र भावना आणि राशी गंभीर जखमी झाल्या.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com