खारतळेगावात पावसाचे राैद्ररुप; काका - पुतणे गेले वाहून

खारतळेगावात पावसाचे राैद्ररुप; काका - पुतणे गेले वाहून
drown

अमरावती : दर्यापूर - खारतळेगाव मार्गावरील खारतळेगाव नजीक रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. या पाण्यात गाडी काढण्याचा प्रयत्न करणारे दोन जण वाहून drown गेले आहेत. अनिल गुडधे (४०) व प्रवीण रामराव गुडधे (३६) अशी बेपत्ता झालेल्यांची नाव आहे. हे दाेघे नात्याने काका पुतण्या आहेत. त्यांचा शोध युध्द पातळीवर सुरु आहे. (two-youth-drown-amravati-news-sml80)

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नीता लबडे या स्वतः बचाव पथकासमवेत घटनास्थळी पाेहचल्या. शोध मोहीम सुरू केली असताना गावकऱ्यांच्या मदतीने गाडी आढळून आली आहे. परंतु वाहून गेलेल्या दोघांनाही शोधण्यात अद्याप यश आले नाही. रात्री अंधार पडल्यामुळे शोध मोहिम थांबविण्यात आली होती.

आज (साेमवार) सकाळपासून शाेध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार नीता लबडे म्हणाल्या आम्हांला घटनेची माहिती समजताच तातडीने बचाव पथकाला घेऊन येथे आलाे आहाेत. अद्याप युवक बेपत्ता आहेत. त्यांचे वाहन मात्र मिळाले आहे. गावक-यांची शाेध माेहिमेसाठी साथ लाभत आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com