धक्कादायक | सावकारांच्या जाचास कंटाळुन दोन तरुणांची आत्महत्या! (पहा व्हिडीओ)

सदरील युवकांच्या हाता पायावर व पोटावर ज्यांनी कोणी दारु पाजुन पैसै दिले आहेत त्याची नावे अजय मुंडे,सुनील मुंडे, हनुमंत घुगे व ऋषी कौडगाव अशी नावे लिहून सही केली असल्याने आढळुन आले आहे
धक्कादायक | सावकारांच्या जाचास कंटाळुन दोन तरुणांची आत्महत्या! (पहा व्हिडीओ)
धक्कादायक | सावकारांच्या जाचास कंटाळुन दोन तरुणांची आत्महत्या! (पहा व्हिडीओ)राजेश काटकर

परभणी : अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन युवकांनीyouth विष पिऊन सामुहिक आत्महत्या suicide केल्याची खळबळजनक घटना सोनपेठ शहरात घडली आहे .पोलीसांनी चार सावकारांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असुन आरोपींचा शोध सुरु आहे. Two youths commit suicide after getting fed up with moneylender's harassment

पाहा व्हिडीओ-

सोनपेठSonpeth शहरातील बुवापीर रस्त्यावर दोन युवक बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे काही नागरीकांना आढळुन आले होते .या युवकांना त्यांच्या नातेवाईकांनी नागरीकांचे मदतीने सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात primary health center उपचारासाठी दाखल केले. युवकांची परीस्थिती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी अंबेजोगाईAmbejogai येथील शासकीय रुग्णालयातGoverment Hospital दाखल केले मात्र उपचारादरम्यान दि ३० रोजी रात्री सुनील पारवे या युवकाचा मृत्यू झाला तर थोड्या वेळातच दुसरा गंभीर असलेला रितेश क्षिरसागर याचा ही मृत्यू झाला आहे.

हातावरती लिहिली सावकाराची नावं

सदरील युवकांच्या हाता पायावर व पोटावर ज्यांनी कोणी दारु पाजुन पैसै दिले आहेत त्याची नावे अजय मुंडे,सुनील मुंडे, हनुमंत घुगे व ऋषी कौडगाव अशी नावे लिहून सही केली असल्याने आढळुन आले आहे. मृत तरुणांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीसांनी Sonpeth police अजय घुगे, सुनिल मुंडे, हनुमंत घुगे व ऋषी यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे धमकी देणे व सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मंचक फड हे करत आहेत.

धक्कादायक | सावकारांच्या जाचास कंटाळुन दोन तरुणांची आत्महत्या! (पहा व्हिडीओ)
किरीट सोमय्यांनी केलेल्या 'त्या' आरोपांमध्ये काडीचीही सत्यता नाही - छगन भुजबळ

अवैध सावकारीत प्रचंड वाढ

सध्या कोरोनाCorona लॉकडाऊनLockdown मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत . रोजगार गेलेल्या लोकांना अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसै देण्यात येतात. या प्रकरणात आरोपींनी मिस्त्री काम करत असलेल्या रितेशला 500 रुपये 100 रुपये रोजाने व्याजावर दिले होते. घाताला काम नसल्याने रीतेश 100 रुपये रोज व्याज देऊ शकत नसल्याने सावकार त्याचा रोज छळ करत असत तर दुसरा मयत सुनील पारवे याला 5 हजार रूपये आठवड्याला 700 रुपये व्याजाने दिले होते .या व्याजाच्या वसुलीसाठी चौघे ही जण छळ करत असल्याने मयतांनी विष पिऊन आत्महत्या केली . अशा अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरीक व्यक्त करत आहेत.

Edited By - Jagdish patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com