अपघातानंतर चंद्रभागा नदीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू..!

पंढरपूर येथील टेंभूर्णी रोडवर असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलावर भरधाव वेगात असणाऱ्या मोटारसायकलचा पुलाच्या कठड्यास धडक बसून अपघात झाला.
अपघातानंतर चंद्रभागा नदीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू..!
चंद्रभागा नदीत बुडून दोन तरूणांचा मृत्यू..!भारत नागणे

पंढरपूर - पंढरपूर येथील टेंभूर्णी रोडवर असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलावर भरधाव वेगात असणाऱ्या मोटारसायकलचा पुलाच्या कठड्यास धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारसायकलवर असलेल्या दोन युवकांना पुलाच्या कठड्यास गंभीर धडक बसून नदीपात्रात कोसळल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली असून या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले दोन्ही तरुण पंढरपूरमधील आहेत. कालच एकादशी झाली आणि आज या दोन तरुणांचा चंद्रभागा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रभागा नदीत बुडून दोन तरूणांचा मृत्यू..!
मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!

अनिल राजेश चौगुले (रा.पंढरपूर) व विक्रम खरात ( रा.गुरसाळे ता.पंढरपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मयत तरूण विना नंबरच्या मोटार सायकलवरून पंढरपूरहून भटुंभरे या गावाकडे जात असताना चंद्रभागा नदीवरील अहिल्यादेवी होळकर पुलावर आले असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. त्या नंतर ते दोघे ५० ते ६० फूट उंचीच्या पुलावरून नदीत फेकले गेले. नदीपात्रातील पाण्यात त्यांचा बुडून अंत झाला. या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com