Barsu Refinery Project : काेकणी माणूस मागे हटणार नाही : बारसूतील आंदाेलनावर ग्रामस्थ ठाम; गैरसमज दूर करू : पालकमंत्री उदय सामंत

साेमवारी बारसूत आंदाेलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Uday Samant, Barsu Refinery Project, Police
Uday Samant, Barsu Refinery Project, PoliceSaam Tv

- अमर घटारे

Barsu Refinery Project : रत्नागिरी (ratnagiri news) जिल्ह्यातील बारसू प्रकल्पाच्या (barsu refinery) विराेधात ग्रामस्थ एकटवले आहे. उद्या (साेमवार) हाेणा-या सर्वेक्षणाचे कामात ग्रामस्थ अडथळा आणू शकतात. त्यामुळे हे आंदाेलन चिरडण्यासाठी सुमारे दाेन ते तीन हजार पाेलिसांच्या बळाचा वापर केला जाऊ शकताे असा अंदाज संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पास स्थानिकांचा विराेध नसल्याचे अमरावती येथे आज स्पष्ट केले. (Maharashtra News)

Uday Samant, Barsu Refinery Project, Police
Mumbai Goa महामार्गावरील Parshuram Ghat वाहतुकीसाठी बंद; प्रवाशांनाे ! जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडीओ)

पीएम मित्रा अंतर्गत राज्यातून एकमेव अमरावती टेक्स्टाईल पार्कला मान्यता मिळाली आहे. त्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठकी करीता उद्याेगमंत्री उदय सामंत (uday samant) हे अमरावती येथे आले आहेत.

त्यावेळी माध्यमांनी मंत्री सामंत यांना बारसू प्रकल्पाविषयी छेडले. त्यावेळी सामंत म्हणाले बारसू प्रकल्प हा माझ्या जिल्ह्यात होणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सॅटेलाईटच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम झालेले आहे. या प्रकल्पास बाहेरचे लोक विरोध करत आहेत.

आम्ही त्यांना व शेतकऱ्यांना समजावून सांगू. बारसु प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करू असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अमरावती येथे स्पष्ट केले.

Uday Samant, Barsu Refinery Project, Police
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : ‘राजाराम’साठी आज सत्ताधारी, विराेधी पॅनेलची बालेकिल्ल्यात सभा; रविवारी मतदान

उद्याेगमंत्री सामंत यांनी सर्वताेपरी पॅकेज देण्यासाठी आमची तयारी आहे. स्कूल, आराेग्य यंत्रणा, काैशल्य विकासच्या माध्यमातून विकास या सर्व गाेष्टी आम्ही करण्याच्या तयारीत आहाेत. दरम्यान काेणीही चिथावणीखाेर भाषा न करता सरकार बराेबर चर्चा करावी असे आवाहन सामंत यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com