काेराेना हा जन्माच्या आधी पासून! ताे राहणारच; उदयनराजे

udayanraje bhosale
udayanraje bhosale

सातारा : जिल्हा प्रशासनाच्या हातात काही नाही. तुम्ही ज्या ठिकाणी भरती हाेणार आहात तेथे ते निवेदन पाठवून देणार. दाेन वर्षांपुर्वी तुम्ही मला का भेटला नाही. दाेन वर्ष वाढवून मिळणे हे सर्व विभागास लागू हाेताे. हे कितपत यशस्वी हाेईल याबद्दल शंका आहे असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी सैन्य भरतीची मागणी करणा-या युवकांशी संवाद साधताना नमूद केले. udayanraje-bhosale-addressed-youth-demanding-recruitment-of-soldiers-satara-trending-news-sml80

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आज (मंगळवार) सैन्य भरती तातडीने व्हावी या मागणीसाठी युवकांनी ठिय्या आंदाेलन छेडले आहे. या आंदाेलनात शेकडाे युवक युवती सहभागी झाले आहेत. या आंदाेलनकर्त्यांची खासदार उदयनराजेंनी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत युवकांनी वेळ न दडवता सैन्य भरतीसाठी तयारी करावी असेही म्हटले.

udayanraje bhosale
पुण्यातील अभिनेत्रीचा आणि तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू

उदयनराजे म्हणाले काेराेनामुळे भरती झाली नाही असे मला आत्ता सांगण्यात आले. काेराेनाचा काळ हाेता, काेराेना आहे आणि ताे राहणारच. काेणी म्हणत असेल काेराेना जाणार तर काेराेना आपल्या जन्माच्या आधीपासून इथं आहे हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही माेबाईलवर चित्रपट पाहण्यापेक्षा जरा वैज्ञानिक दृष्टीकाेनात गाेष्टी समजून घ्या. काेराेनाच्या coronavirus गाेष्टीचे वाचन करा असा सल्ला उदयनराजेंनी उपस्थित युवकांना दिला. दाेन वर्षांपुर्वी आम्हांला निवेदन दिले असते तर आम्ही काेविड १९ चे मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन वरिष्ठ कार्यालयात दिले असते असे प्रशासनाने मला सांगितले.

तुम्ही वेळ गमावून बसला आहात. नाेव्हेंबरला भरती करायची असल्यास वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार हाेणे आवश्यक आहे. तुम्ही प्रशासनास निवेदन द्या, मी त्याचा पाठपूरावा करीन. जिल्हा प्रशासनाच्या हातात काही नाही असेही खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale यांनी नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com