Udayanraje Bhosale News: 'या' प्रश्नावर उदयनराजे भाेसलेंचा काढता पाय... समर्थकांचा हशा

साता-यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उदयनराजे भाेसले आले हाेते.
Udayanraje Bhosale, Sharad Pawar, Nagaland
Udayanraje Bhosale, Sharad Pawar, Nagalandsaam tv

Satara News: तिथं जे ठरलं तसचं उद्या इथे ही ठरेल. प्रत्येक ठिकाणी ठरेल..माहिती नाही...वेट अँड वॉच... असे मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी नागालँड (Nagaland) येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) यांच्यातील दिलजमाईच्या प्रश्नावर माध्यमांनसमाेर व्यक्त केले.

Udayanraje Bhosale, Sharad Pawar, Nagaland
The Royal Kolhapur Horse Show: युवराज मालोजीराजे छत्रपतींनी द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो याची केली घाेषणा; जाणून घ्या वेळापत्रक

उदयनराजेंनी आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उदयनराजेंनी उत्तर देताना नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र स्थापन केलेल्या सरकार बाबत सूचक वक्तव्य केले.

Udayanraje Bhosale, Sharad Pawar, Nagaland
Satara : लग्न मालक राहिला बाजूला अन, वाढप्यांचीच पळापळ ! शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टाेला

Wait & Watch

खासदार उदयनराजे म्हणाले नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. तिथं जे ठरलं तसचं उद्या इथे ही ठरेल. प्रत्येक ठिकाणी ठरेल...माहिती नाही...Wait and watch असं उदयनराजेंनी नमूद केले. (Maharashtra News)

उदयनराजेंचा या प्रश्नावर काढता पाय

दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्र येतील का या माध्यमांच्या प्रश्नांवर उदयनराजेंनी पक्ष्यांच्या (birds) बाबतीत विचारलं असतं तर ठीक पक्षांचं नको असे म्हणत राजेंनी काढता पाय घेतला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com