
Udayanraje Bhosale : निर्लज्जपणाची हद्द झाली. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला. राहिला प्रश्न आमचा आदर, अनादर करण्याचा... तर कोणाचा घास नाही असेही उदयनराजेंनी टीकाकरांना ठणाकावून सांगितलं.
साता-यातील (Satara) जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांनी उदयनराजेंना गाठत त्यांना संजय राऊतांविषयी बाेलतं केले. त्यावेळी राजेंनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.
शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी साता-यातील शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संजय राऊतांनी आमदार शिवेंद्रराजे आणि राजघराण्यावर बाेचरी टीका केली. त्याबाबत उदयनराजेंना आज माध्यमांनी छेडले असता उदयनराजेंनी राऊतांना त्यांच्या विधानावरुन सुनावलं.
उदयनराजे म्हणाले विकृत स्वभावामुळे रावतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते आहे. या विकृतीत वाढत हाेताना दिसत आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून वक्तव्य केलं पाहिजे.
मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही असेही उदयनराजेंनी नमूद केले. संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी यापुर्वी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले हाेते. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळतात. त्यांची विधानं राजकीय स्वार्थासाठीची असतात. (Breaking Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.