
Udayanraje Bhosale : अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना (farmers) नुकसानीचा मोबदला तसेच भरपाई तातडीने मिळाला तरच तो सावरला जाईल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना याेग्य ती कार्यवाही करावयाची आदेश द्यावेत अशी मागणीपर सूचना खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना केली आहे. दरम्यान राजेंनी मागणीचे निवेदन देखील जिल्हा प्रशासनास दिले आहे.
पुढील महिन्यातील 15 दिवसांनी खरीप हंगाम संपेल. तरीही जागतिक हवामानातील बदलांमुळे सातारा जिल्ह्यात सर्वत्र सप्टेंबर महिन्यात अवेळी पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने घेतल्या जात असलेल्या हळद, आले, बटाटा, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या, भुईमुग, ऊस, भातपिके, बाजरी, ज्वारी, टोमॅटो, द्राक्षे, आदी खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान होत आहे. हाताला आलेली पिके मुळांना हवा मिळत नसल्यामुळे कुजलेली आहेत.
काही पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. पूर्ण वाढ झाली नसल्याने पिकांची काढणीही करता येत नाही अश्या व्दिधा मनस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी सापडलेला आहे. हीच परिस्थिती अति पावसामुळे राज्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने, आले, हळद, उस, बटाटा, टामॅटो, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, ज्वारी, बाजरी,भात, पालेभाज्या,आदी पिके कुजून नष्ट झाली आहेत. शेतकऱ्याने मेहनतीने केलेल्या लागणीची पिके हाताशी आल्यावर अशी परिस्थिती उद्भवली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले दिसून येत आहे.
या परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील पिकांचे करुन, किंबहुना, नुकसान झालेल्य पिकांचे, स्वतंत्रपणे प्रति एकरी प्रति पिकांप्रमाणे किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे.
शेतकऱ्यांना अवेळी-अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासनाकडून शक्य तितक्या लवकर प्राप्त करुन देण्यासाठी कृषी आणि महसुल विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी चर्चा करुन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी यांना तातडीने कराव्यात असेही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान वेळी-अवेळी होणा-या पावसामुळे शेतक-यांचे कोणतेही नुकसान होवू नये म्हणूनच आम्ही ईर्मा योजना लागु करावी अशी मागणी तत्कालीन शासनाकडे भुमाता गौरव दिंडीच्या माध्यमातुन सुमारे 13 वर्षापासून वेळोवेळी केली आहे. ईर्मा योजना लागु असती तर अवकाळी होणा-या पावसामुळे होणारे नुकसान भरुन निघाले असते. परंतु ईर्मा योजना लागु नसल्याने शासनाने याकामी शेतक-यांना तातडीने मदत दिली पाहिजे असं उदयनराजेंनी नमूद केले.
अवकाळी पावसामुळे होणा-या नुकसानीबाबत, भरपाई मिळण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर बोलणार असल्याचे राजेंनी म्हटलं आहे. तथापि वेळ प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांची देखील भेट घेवून शेतकऱ्यांना भरीव सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राजेंनी नमूद केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.