तसं कुणाला जमत नाही; उदयनराजेंनी केले मुख्यमंत्र्यांचे काैतुक

तसं कुणाला जमत नाही; उदयनराजेंनी केले मुख्यमंत्र्यांचे काैतुक
Udayanraje Bhosale

सातारा : खासदार उदयनराजे भाेसले Udayanraje Bhosale यांनी आज (बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray चालवित असलेल्या राज्याच्या सरकारबाबत काही अंशी समाधान व्यक्त केले आहे. तीन पक्षांचे सरकार चालविताना स्टेअरींग इकडं-तिकडं हाेत असेल पण ही गाेष्ट साेपी नाही सहजासहजी काेणाला जमत नाही असे मुख्यमंत्री ठाकरेंबाबत त्यांनी नूमद केले.

राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी भेट घेतली. तेथे त्यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने सातारा शहरातील व जिल्ह्यातील विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Udayanraje Bhosale
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन

येत्या लाेकसभा असाे अथवा विधानसभा निवडणुका असाे अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील स्टेअरींग तुमच्या हाती असेल का या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले खरंतर हा प्रश्न त्यांनाच विचारा कारण मला नेमके काेड पडलय. त्यांचे स्टेअरींग काेठे चालले आहे. ख-या अर्थाने ते कलाकार आहेत. सहजासहजी काेणाला जमत नाही. आपल्या आपले हे स्टेअरींग चांगला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com