Satara: मालशे पुलाचा 'उद्याेग' उदयनराजेंनी पाहिला; ओढयाचा प्रवाह खूला करण्याचे दिले आदेश

खासदार उदयनराजे भाेसले यांना उत्तरे देताना बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची चांगलीच तंतरली.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSaam Tv

सातारा : यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलालगत नैसर्गिक ओढा बेकायदेशीररित्या बंदिस्त करून विकसकाला परस्पर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे असा आरोप खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी नुकत्याच आयोजिलेल्या बैठकीत झाला. त्यामुळे खूद्द खासदारांनीच घटनास्थळी भेट देत मालशे फुलाची पाहणी केली. ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवू नका तसेच येथील अतिक्रमणे तातडीने काढा अशा सूचना उदयनराजेंनी (satara) पालिका प्रशासनाला दिल्या. (udayanraje bhosale latest marathi news)

या प्रकरणी माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांनी पालिकेत तक्रार केली हाेती. तसेच खासदार उदयनराजेंनी बाेलाविलेल्या बैठकीत (meeting) याची चर्चा झाली. मालशे पूल विकसन प्रकरणात कागदावर नऊ मीटरचा रस्ता दाखवून प्रत्यक्षात पूलाची भिंत पन्नास फूट आत बांधण्यात आल्याचे गाेडसे यांचे म्हणणे आहे. गाेडसे यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ जागेची पाहणी करून सार्वजनिक क्षेत्रातील रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.

Udayanraje Bhosale
संभाजीराजेंचा अवमान; तहसीलदारांसह सहायक धार्मिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नाेटीस

याबाबत गाेडसे म्हणाल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मालशे पुलाची पाहणी केली. या पाहणीत पूलाची दगडी कमान आर्च पद्धतीची बांधलेली असताना त्यातूनच दोन मीटर व्यासाचा पाइप बाहेर काढून त्याचे पात्र बंदिस्त करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. डीपी प्लॅनमध्ये रस्ता नऊ मीटरचा असताना प्रत्यक्षात पुलाची भिंत शंभर फूट आत बांधण्यात आली आहे. येथील जागा ही जिल्हाधिकार्‍यांच्या मालकीची असताना त्याच्या लगतचा प्लॉट विकसकाला कसा उपलब्ध होईल. याकरिता पालिकेकडून 51 लाख रुपये खर्च करून पुलाचे विकसन करण्याचा उद्योग काही मंडळींनी केला आहे.

Udayanraje Bhosale
Satara: सातारकरांनाे सावधान! नारळ फाेड्या गॅंग आली : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

दरम्यान या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ओढयाचा प्रवाह तातडीने मोकळा करून चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पुलाची भिंत तातडीने पाडा अशा सूचना राजेंनी केल्या आहेत.

Udayanraje Bhosale
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com